मुंबई : देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही काळजी घ्या, तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं आहे. मोदी यांच्या या विधानाचे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. येत्या काळात शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना फोन आला होता. अत्यंत काळजीने आणि प्रेमाने त्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली. तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. तुम्ही देशासाठी आतापर्यंत काम करत आला आहात. सुप्रिया ताईही चांगलं काम करत आहे. तुम्ही आता आराम करा. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तब्येतीची काळजी घ्या आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असं मोदी पवारांना म्हणाल्याचं विठ्ठल मणियार याांनी सांगितलं. त्यावर मी तब्येतीची काळजी घेत आहे. तुम्ही सर्व असल्याने मला काही चिंता नाहीये. मी तब्येतीची काळजी घेतो, असं पवारांनी मोदींना सांगितल्याचंही मणियार म्हणाले.
व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (बुधवारी, ता ४) रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. वातावरण बदलल्यामुळे शरद पवार यांना छातीत कफ झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून शरद पवार पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. आता शरद पवार यांची प्रकृती ठीक आहे. दोन दिवस डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. आज डॉक्टरांनी तपासणीनंतर डिस्चार्ज दिला आहे. शरद पवारांना घरी नेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे रूग्णालयात दाखल झाल्या होत्या.
शरद पवार यांना अखेर आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. आता रुग्णालयातून पवार थेट मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे निघाले आहेत. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे असणार आहेत. डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवार हे दुष्काळ पाहणीसाठी दौर्यावरती होते, त्यादरम्यान त्यांना हवामान बदलामुळे कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज ते पुण्यातून मुंबईच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. दोन दिवसांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला आहे. पुढचे काही दिवस ते मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आराम करणार आहेत, ते दुष्काळी दौर्यावरती होते, त्यावेळी उन्हामुळे आणि अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलाने शरद पवारांना कफ झाला होता. त्यानंतर त्यांचा दुष्काळी पाहणीचा दौरा रद्द करण्यात आला होता. तसेच त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. शरद पवार यांना कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. विविध चाचण्याही करण्यात आल्या होत्या. त्यांची प्रकृती आता स्थिर झाल्याने त्यांना दोन दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रूग्णालयातून बाहेर आले, हात उंचावले
शरद पवार यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ते रुग्णालयाच्या बाहेर आले. व्हिलचेअरवरूनच त्यांना बाहेर आणलं. बाहेर आल्यावर त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना पाहून हात उंचावले. त्यांचा हा फोटो समोर आला आहे. त्यानंतर कारमध्ये बसले आणि मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. रुग्णालयातून निघण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्व स्टाफचे हात जोडून आभार मानले.